शाहिस्तेखान,
आपल्या मनात अशी शंका का आली? जिथं श्रद्धा असते, तीथं शंका नसते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या धर्माने सांगितलेल्या पद्धतीचा आपल्या पापक्षालनाच्या पद्धतीचे अवलंब करते, तेव्हा तीचे मन शंकेखोर नक्कीच नसते. आणि जेव्हा मन शंकेखोर नसते तेव्हाच ते आपल्या मनाचे दरवाजे सताड उघडते. मनाचे दरवाजे सताड उघडल्यानंतरच आपल्या हातून झालेली कृत्ये माणूस आपल्या तोंडाने कबूल करतो, मनातले ओकून मन स्वच्छ करतो. माझ्या मते कंन्फेशन बॉक्स ची पद्धत, आपली पापं सांगण्यासाठी नसावी ती कदाचित आपले मन शंकेखोर न होता सश्रद्ध होवून आपल्या मनातूनच उत्तरं शोधण्यासाठी असावी.
जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मन सताड उघडं करतं तेव्हा समोरच्या व्यक्तीला ही आपलं मन मोठ्ठं करूनच त्याचं/तीचं एकून घ्यावं लागतं. त्या व्यक्तीच्या मनातलं जाणून त्याचा वापर इतर कोणत्या गोष्टीसाठी करायचा विचार जरी त्याक्षणी वा त्यानंतर आणला तर ते एकून घेण्याऱ्यालाच त्याचा भयानक त्रास होऊ शकतो. (अशा नाजूक क्षणी दोन मने एकमेकांसमोरील आरश्यातील अनेक प्रतिबिंबासारखे असते.) हे असे असे इतर नियम पाद्रींना शिकवले जात असावेत, त्यानंतरच ते पाद्री होतात. त्यामुळेच तुमची शंका निराधार वाटते.