Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

नेहमी सारखीच सकाळ झाली. आपल्याला रूटिनाची इतकी सवय लागलेली असते, विशेषतः वीकडेज मध्ये. जरासा क्रम चुकला तरी खूप चिडचिड, अस्वस्थपणा येतो. अगदी शुल्लक गोष्टीही आपला पारा चढवतात. हयावर मात करायला हवी हे गेली किती वर्षे मी स्वतःला सांगतेय पण दिल्ली अभी भी बहोत दूर हैं.

तर, पोराला उठवले, त्याचे आई प्लीज पाच मिनिटे, दोन मिनिटे सरतेशेवटी एक सेकंद ह्या सगळ्या प्रकारातली गाढ झोपेची जादू अनुभवूनच तो उठला. मग नुसती धावपळ. रिक्षावाला ६.४५ ला येई. फक्त अर्धा तास आणि ह्या ढोल्याचे स्वतःच्या नादात आवरणे. दररोजची हाणामारी. अंघोळीला नेला की शॉवर खाली मांडी ठोकून बसे आणि गाढ झोपे. सासरे तसेच त्याला साबण लावत, धुऊन काढीत. मग पुन्हा दूध प्यायला बसला की एक डुलकी. मी व सासरे ...
पुढे वाचा. : तिच्या न येण्याची वाट पाहू लागले