खूप अतिरंजित वाटला विशेषतः मध्यांतरानंतर.

राजकारणी मित्राची वागणूक पाहूनही त्याच्याच कॉलेज मध्ये मुलाच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणे चुकिचे वाटते.

ऐतिहासिक दृष्टीनेही अनेक चुका आहेत. उदा. अफजलखान सैन्यासह घोड्यावरून येताना दाखवला आहे. आग्र्यात नजरकैदेत शिवाजीमहाराज सिंहासनावर बसलेले दाखवले आहेत.

मांजऱ्याचा शिवाजी बघवत नाही. गुंड तो गुंडच. जिरेटोप घातला म्हणून काय झाले? त्याच्या डोळ्यात शिवरायांचे भाव दिसायच्या ऐवजी माफियाचे भाव दिसतात.