ती तातास म्हणे कच, गुरुभक्त साधू कुलीन कार्यकर

२२२१ १२ ११ =१२  ११२१ २२ १२१ २१११ = १८   

परी त्यास सोडिले जळ, जळ सोडूं मजही आर्यकर /

१२२१ २१ २१२ ११= १६   ११ २२ ११२ २१११= १५

गीती (मोरोपंत) -

शल्य म्हणे राधेया, जेव्हा स्मरोनी कर्मांतें

२१ १२ २२२= १२  २२ १२२ २२२=१५

अर्जुन तीव्र शरांनी, समरी भेदील सर्व मर्मांतें
२११ २१ १२२= १२  ११२ २२१ २१ २२२=१८

वृत्ताच्या लक्षणाप्रमाणे मात्रा जमत नाहीत. मी संदर्भ दिलेल्या व्याकरणाच्या पुस्तकात गीती आणि आर्या दोन्ही एकच असे म्हटले आहे.
अर्थात या सर्व गोष्टींचा आपण देत असलेल्या आर्यांशी संबंध आहे अशातला भाग नाही. फक्त वृत्ताचे नाव दिल्यावर लक्षणाबरहुकूम ते वृत्त असावे एवढीच अपेक्षा !