माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे अंत्यविधींमध्ये (पाण्यने भरलेला? ) एक घडा मागे वळून न बघता डोक्यावरून मागे फेकून फोडण्याचा एक विधी असतो. 'मृत व्यक्तीशी इहलोकातील सर्व जीवित व्यक्तींचा संबंध संपला' असे यातून सूचित होते असे वाटते. (चूभूद्याघ्या. )
'एखाद्या व्यक्तीशी आयुष्याचा (लग्न)संबंध संपला' हे सूचित करण्याच्या क्रियेला 'घटस्फोट' या संज्ञेचा उगम या विधीपासून आहे असे ऐकलेले आहे. (पुन्हा चूभूद्याघ्या. )
(तज्ज्ञांनी / माहीतगारांनी योग्य त्या सुधारणा सुचवाव्यात. )