Onkar Danke येथे हे वाचायला मिळाले:
सध्या संपूर्ण देश निवडणुकीला सामोरा जातोय.जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान कोण असणार ह्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही.त्यातचं या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला अथवा आघाडीला बहुमत मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसंच प्रादेशिक नेत्यांना पंतप्रधानपदाचे वेध लागले आहेत.
काँग्रेस पक्षानं यंदाच्या निव़णुकीत पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंग यांना आपला उमेदवार घोषीत केलंय.मात्र युपीएमधल्या सर्व पक्षांमध्ये मनमोहन सिंग यांच्या नावावर एकमत नाही ही बाब आता लपून राहीलेली नाही. त्याचबरोबर अणुकराराच्या मुद्यावरुन डावे पक्ष आणि मनमोहन सिंग यांच्यात संबध बरेच ताणले गेलेत.त्यामुळे डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यास मनमोहन सिंग यांना बलिदान द्यावे लागेल.प्रणब मुखर्जी हे काँग्रेस पक्षामधले दुस-या पक्षाचे महत्वाचे नेते. सर्वच महत्वाच्या खात्यांचा त्यांना अनुभव आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ' पीम इन वेटींग ' असं ...
पुढे वाचा. : इस बार...सुशीलकुमार ?