माननीय सतीशजी,

माझ्या मनात अशी शंका नाही, तर 'विचार' आला. पाद्री असे करतात असे मला म्हणायचे नाही. पाद्रींनी असे करायला हवे का हा मला पडलेला प्रश्न आहे. चर्चेचा प्रस्ताव असल्याने प्रत्येक मत-मतांतराचे स्वागत आहेच.

’तारतम्याने विचार करून निर्णय घ्यावा’ हे स्मिता यांचे म्हणणे पटते. धर्मगुरूने पोलीसगिरी करावी अशी अपेक्षा नाही. पण आपल्या लहानश्या कृत्यामुळे असंख्य लोकांचा फायदा होत असल्यास धर्मगुरूला धर्मसंकट पडू नये, असे वाटते.