साक्षीबुवा,
तुम्ही हुतात्म्यांवर लेख लिहिल्यामुळे ही सगळी माहिती वाचायला मिळते आहे याबद्दल तुमचे आभार कसे मानावेत? नाहीतर शालेय पाठ्यपुस्तकांमधून फक्त नेहरू - गांधी - काँग्रेस आणि तथाकथित स्वातंत्र्ययुद्ध यांच्याबद्दल तावचे ताव छापून, या क्रांतिकारकांना कायम अंधारात ठेवले जाते. वास्तविक हा इतिहास अधिक स्फूर्तिप्रद आणि रोमहर्षक आहे.
तुमच्या लेखांमुळे या क्रांतिकारकांबद्दल अगदीच ' नाही चिरा नाही पणती ' अशी अवस्था तरी होत नाही.
या लेखातील नुसती चित्रेच पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. त्वेषाने मुठी वळल्या गेल्या.
धन्यवाद
--अदिती