धाय हा शब्द 'हृदय'पासून बनला हे अगदी पटण्यासारखे आहे.  धाय/धायाचे शब्दकोशातील आणखी अर्थ--हृदय; हंबरडा, मोठ्याने रडणे; दाई, धात्री; धास्ती; समाधान वगैरेही असल्याने 'धाय'ची आणखीही काही व्युत्पत्ती असावी. बरे धाय म्हणजे हृदय असे धरले तर, धायधाय रडणे((ढळढळा रडणे) म्हणजे काय हृदयहृदय रडणे? साधारणपणे दोन समान शब्द जोडून एक शब्द बनतो तेव्हा त्याचा अर्थ खूप आणि अनेक असा होतो.  उंच‌उंच इमारती(अनेक खूप‌ उंच इमारती), हळूहळू(खूप हळू), पुन्हापुन्हा(अनेकवेळा दोनदा), खोलखोल(अतिशय खोल) इत्यादी. तेव्हा धायधाय रडणे म्हणजे हंबरड्यावर हंबरडे काढून रडणे असा अर्थ असावा.