भूषण,
हे गाणं अस्तित्वात आहे. मीसुद्धा हे गाणं दूरदर्शनवर (सह्याद्री वाहिनीवर), ५-६ वर्षांपूर्वी पाहिलंय... तेही अनेक वेळा...
चित्रीकरणात जरी स्त्री आणि पुरुष असलेत तरी गाणं फक्त स्त्रीने गायलंय (असं आठवतंय).
पण त्या गाण्याचा इतर कोणताही तपशील त्यात दाखवला नसल्याने कवी, गायक, संगीतकार, इ. कोण याची कल्पना नाही
---------------
अवांतरः हा प्रतिसाद लिहिण्याआधी जालावर बराच शोध घेतला पण ते गाणं कुठेही सापडलं नाही. कुणाला माहिती असल्यास कृपया येथे दुवा द्यावा... मला आवडायचं ते गाणं...