एक चित्रपट काढणे म्हणजे विनोद नाही. - तो विनोद आहे असे मी म्हणालो नाही.
आपल्यापैकी किती लोकं हे धाडस करू शकतील. - हा प्रश्नच येत नाही. जे आहे त्यावर चर्चा आहे, काय होईल त्यावर नाही.
चित्रपटाचे परीक्षण म्हणजे चांगल्या-वाईट बाबी लिहिणे. केवळ टिका करणे नव्हे. - मान्य आहे. मी जे वाईट आहे ते लिहिले.
या विषयावर फँटसीमय चित्रपट काढला हे ही थोडके नसे. "राज नंदा" शी सहमत. - आपल्या या मताचा आदर आहे.
गांधी चालतो मग शिवाजी महाराज का नाही? - कोण म्हणतो 'शिवाजी महाराजांवरचा चित्रपट' चालत नाही? मलाही चालत आहे अन व्यावसायिकदृष्ट्याही चालतच आहे. पण या चित्रपटात महाराजांच्या विशाल कर्तृत्वाची थोडीशी थट्टा झाल्यासारखी वाटली. ( त्यांच्या सहाय्यकाने मध्येच विनोद करणे, कृत्रिम घोडेस्वारी दाखवणे, ट्रकच्या धडकेपासून एखाद्या हिंदी नायकाप्रमाणे कुणालातरी वाचवणे वगैरे गोष्टींमधे! )
सगळे नियम मराठीलाच लागू करायचे आणि हिंदीवाल्यांनी (आणि आता भोजपुरी) काहीही केले तरी चालवून घ्यायचे हे योग्य नाही. - मी मराठीला काहीही नियम लागू करू पाहत नाही आहे. फक्त एवढेच म्हणत आहे की इतक्या ज्वलंत विषयावर अश्या हास्यास्पद पद्धतीने चित्रपट काढू नये, भाषा कुठलीही असो. तसेच, हिंदीवाल्यांनी काहीही केले तरी मला चालत असावे हा आपला निष्कर्ष 'बिनबुडाचा' म्हणतात तसा आहे.
स्वतः करून बघा - हे आपल्या प्रतिसादाचे शीर्षक मात्र काही समजले नाही. आपल्याला असे म्हणायचे आहे काय की एखाद्या विषयावर बोलण्यासाठी ती गोष्ट माणसाने केलेलीच असली पाहिजे? तसे असेल तर बऱ्याच माणसांना कित्येक गोष्टी बोलताच येणार नाहीत.