दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मंडळी…
मी सांगत असलेल्या माहितीचा तुम्हाला थोडाफार का होईना पण उपयोग होतो आहे असं मानून आज पुढची पोस्ट टाकतो आहे. मागच्या पोस्टमध्ये आपण एकरंगसंगतीची माहिती घेतली. आज आता आपण विरोधी रंगसंगती म्हणजे काय आणि ती कशी तयार होते, याची माहीती घेऊ.
विरोधी रंग संगती अर्थात म्हणजे काय हे आपण रंगचक्राच्या आधारे माहित करून घेऊ. थोडक्यात सांगयचं तर रंगचक्रावरचा कोणताही एक रंग आणि त्याच्या बरोबर समोरचा एक रंग असे दोन रंग आणि त्या रंगांच्या शेड्स आणि टिंट्स यांच्यापासून जी रंगसंगती तयार होते ती म्हणजे विरोधी रंग संगती. रंगचक्र बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २