डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


कुठलेही धार्मिक कार्यक्रम मला लांबुनच बरे वाटतात, पण माझ्या लग्नात मात्र मला सहभागी व्हावे लागणारच होते. त्यामुळे जशी जशी तारीख जवळ येत होती, तशी तशी माझी चिंता वाढतच होती. ते गळ्यात हार-तुरे घालायचे, तो साधु काय बोलतो ते ऐकायचे, मधेच तो काहीतरी म्हणायला सांगतो तसे म्हणायचे, बहुतेक वेळेला सुरुवात “मम” पासुनच असते, समोर आगीचा डोंब उसळलेला असतो, त्यात अजुन सारखे तुप घालायचे, त्यात अंगात भरजरी कपडे सांभाळायचे. मग लग्नानंतर भेटायला येणाऱ्यांबरोबर उगाचच खोटे खोटे हसायचे, मला हे सगळे जिवावर येते. मी सगळ्यांच्या हाता-पाया पडलो की नोंदणी पध्दतीने विवाह करू, पण माझे कोणी ऐकेल तर. अगदीच माझ्यावर उपकार म्हणुन आदल्या दिवशीचे श्रीमान पुजन का काय असते ते रद्द केले. सगळ्यांचे उत्तर एकच.. हौस-मौज असते, करुन घ्यायची.. हो..मान्य आहे, पण कुणाची, माझी का तुमची?. सगळ्यांच्या उत्साहाला नुसते उधाण आले होते. मला तसाही खरेदी मधे उत्साह नव्हता, त्यामुळे बाकीच्या लोकांनी त्यांची खरेदी करुन घेतली, पण शेवटी कुणीच उरले नाही तेंव्हा मला जबरदस्तीने खरेदीसाठी घेउन गेले. मग असंख्य प्रश्न, काय घ्यायचे, कोट घ्यायचा की जोधपुरी, की शेरवानी. खरे सांगतो, मला त्यातला फरकच कळत नाही. शेवटी त्यातल्या त्यात बरे दिसणारे घेउन बाहेर पडलो.

लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, होणाऱ्या बायकोचा फोनः इकडुन गाडी निघालीये तुम्हाला घ्यायला. तयार आहेस ना? [उगाचच युध्दाला वगैरे तयार असल्यासारखे वाटले]. काय कपडे घातले आहेस? काळ्या रंगाचे नको घालुस. [घ्या. झाले का.. मी तर काळ्या रंगाचाच शेरवानी का चुडीदार का काय ते घातले होते] मी आपले बर म्हणुन फोन ठेवुन दिला. तेव्हड्यात गाडी आलीच. मग आम्ही सगळे बाराती निघालो. कार्यालयापाशी दारातच आडवले.. जकात भरायला नाही हो.. ओवाळायला.. [बुट का मोजुडे काढा, पाय धुवा, परत घाला.. वैताग क्र.१] जिजु-जिजु ...
पुढे वाचा. : तदेव लग्नं..