Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close...आयुर्वेदात आहाराविषयी अतिशय परिपूर्ण असे मार्गदर्शन केलेले आढळते. आहार प्रकृतीनुरूप असावा ही आयुर्वेदाची मुख्य संकल्पना. अर्थात, ही अंमलात आणायची तर त्यासाठी स्वतःची प्रकृती माहीत असायला हवी व आहारातील प्रत्येक वस्तूचे गुण-दोष कळायला हवेत. रोजच्या जेवणात असायलाच हव्या अशा गहू, तांदूळ, मूग-तूरीपासून ते भाज्या, फळे, दूध, ताक वगैरे सर्व पदार्थांचे गुण, त्यांचा स्वभाव, त्यांचा दोषांवर होणारा परिणाम या सर्वांचे आयुर्वेदात विस्तृतपणे वर्णन केलेले आढळते.