जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
उद्या ३० एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडत आहे. राज्यात उद्या होणारे मतदान हे मुंबई, ठाणे व रायगड भागात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते व निवडणुकीला उभे असलेले उमेदवार यांनी आपल्याला भरमसाठ आश्वासने दिली असतील. लक्षात घ्या, आपण जे मतदान करणार आहोत, त्यामुळे पुढच्या पाच वर्षांसाठी आपण आपल्या खासदाराची निवड करणार आहोत. हा खासदार स्वच्छ चारित्र्याचा व प्रतिमेचा असला पाहिजे, यावर भर देऊनच मतदानाचा अधिकार बजावा. पक्ष न पाहता व्यक्ती म्हणून मतदान करा. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, असे म्हणून ...