काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


मॅनेजमेंटची पुस्तकं तशी वाचायला बोअर होतात. तुम्ही एखादं आर्टिकल वाचायला घेतलं की  कशी मस्त झोप येत बघा . एक पान अगदी फारंच झालं तर दोन पानं वाचली की मग मात्र डोळ्यावर झापड येते. पण तेच  एखादं फिक्शन वाचायला घेतलं तर  झोप कां येत नाही??

समजा…तुम्ही ऑफिस मधे बसले आहात, अगदी एखाद्या सिरियस मिटींग मधे , लॅप टॉप समोर आहे उघडलेला. कुठली तरी एखादी एक्सेल शिट उघडी आहे आणि कोणितरी तावातावात कुठला तरी मुद्दा मांडतोय, खरं तर मिटिंग मधे तुमचं कांहीच काम नाही. पण केवळ बॉस ने म्हंटलं म्हणुन तुम्ही मिटींगमधे बसले आहात. समोरच्या प्लेट मधली बिस्किट्स पैकी  बॉर्न बॉर्न  संपली आहेत. आता मोनॅको कडे हात वळतोय. मारी बिस्किट मात्र कोणितरी थोबाडित मारल्या सारखी दुर्लक्षित पडली आहेत. एक कुठलंसं क्रिम बिस्किट ज्याच्यामधे क्रिम आहे, आणि मधल्या ...
पुढे वाचा. : बॉडी लॅंग्वेज