ठेवली मुद्दाम आहे मी अलामत ही 'उ' ला
येथील 'उ'ला ही शब्दयोजना फार उत्तम जमून आली आहे, ह्यात शंकाच नाही.
मात्र एक निरीक्षणः
कवितेत जेव्हा अक्षरांचा अक्षरे म्हणूनच उल्लेख येतो तेथे ती लघ्वक्षरे असली तरी ती उच्चारताना त्यांचे वजन (उच्चारण्यास लागणारा कालावधी) गुर्वक्षराइतका होतो त्यामुळे ती गुरु धरावी लागतात, असा माझा अनुभव आहे.
उदा. (मुद्दाम बनवलेले उदाहरण. )
'ग', 'म', 'भ' इतकी कुठेच नसती साधीसुधी अक्षरे
ही शार्दूलविक्रीडितातली ओळ पाहिली तर सुरवातीची ग - म - भ ही अक्षरांची यादी वाचताना ती एकेक गुर्वक्षर असल्यासारखी उच्चारली जातात की नाही ते पाहावे.
किंवा अंकगणिताच्या पुस्तकात नेहमी येणारे उदाहरण :
'अ'चे घर 'ब'च्या घरापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे....
ह्या वाक्यात अ, ब ही अक्षरे दीर्घ उच्चारली जातात. (अऽचे घर बऽच्या घरापासून ... अशी)
अर्थात ह्या विडंबनाचा हलकेफुलकेपणा पाहिल्यास हा फरक किरकोळ मानायला हवा, असेच मला वाटते.