'पाचावर धारण बसली' हा वाक्प्रचार मी अजूनतरी 'इतकी घाबरगुंडी उडाली की, माझी हवा टाईट झाली' असं म्हणण्यासाठी असतो असे समजतो.  'हवा टाइट झाली' म्हणजे घाबरून जावून चड्डी पिवळी होवू नये म्हणून गुदद्वार घट्ट दाबून धरणे. गुदद्वारावरील नियंत्रणावरचा ताबा सुटला म्हणजे सगळं संपलं!!!

धाय मोकलून रडणं म्हणजे काय? असं जर एखादा विचारत असेल तर त्याने आयुष्यात कधीही लहानपणी आपल्या आईवडीलांचा मार खल्लाच नाही, असं म्हणता येवू शकतं. असं रडताना श्वास अक्शर्षा गळ्यापाशी अडकतो. खोकला लागतो. डोळ्यासमोर काजवे चमकतात. आपल्यावर प्रचंड अन्याय झाला आहे अशी त्याक्षणी भावना झालेली असते.

संकेतस्थळावर लोक 'टेक्स्ट'ची देवाण-घेवाण करण्यासाठी येतात का? 'मोल्सवर्थ मध्ये ह्याँव लिवलेले आहे मोल्सवर्थ मध्ये त्याँव लिवलेले आहे' असं कोणी सांगत असेल तर मला वरील प्रश्न विचारणाऱ्यापेक्षाही अशा लोकांचीच किव येते. बिचारे..... 'लकीर के फकीर'.