Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकेमधून प्रसिद्ध होणारे ‘टाईम’ हे मासिक त्याच्या दर्जाबाबत जितके प्रसिद्ध आहे तितकेच ते त्यात प्रसिद्ध होणाऱ्या ‘Person of the Year’ किंवा ‘Most Influential Person of the Year’ यासारख्या याद्यांमुळेही चर्चेत असते. प्रत्येक वर्षी हा बहुमान कोण मिळवणार याबद्दल जगभरात कुतूहल असते. काही दिवसांपुर्वी यावर्षीची ‘Most Influential Person of the Year’ यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा मात्र वाचकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. यादीत 1 नंबरवर बराक ओबामा, दलाई लामा, पुतीन, ओप्रा विनफ्रे यासारख्या दिग्गजांना मागे टाकत ‘मुट’ या नावाच्या व्यक्तिने सर्वाधिक पसंतीची मते मिळवली होती. हा मुट ‘हा’ आहे की ‘ही’, काळा की गोरा, माणुस की वस्तू हेसुद्धा बहुतेकांना माहीत नव्हते. अशा परिस्थितीत सर्वाधिक लोकांनी त्याच्या पारड्यात आपले मत टाकणे म्हणजे आश्चर्याची परिसीमाच!

कोण हा मुट?

टाईमच्या स्लाईड्समध्ये या बाबाबद्दल ही अशी माहिती दिलेली आहे. पण प्रत्यक्षात निकाल हातात आल्यावर मात्र टाईमने थोडे कष्ट घेऊन बहुधा अधिक माहिती मिळवली आहे -

म्हणजे नोकरीसुद्धा नसलेल्या या 21 वर्षांच्या पोऱ्याने भल्याभल्यांना मागे टाकले!

पण खरी गंमत ही नव्हे. या ऑनलाईन वोटींगचे हॅकर्सनी (प्रचंड कष्ट घेऊन) तीन-तेरा कसे वाजवले हे वाचणे प्रचंड थ्रिलींग आहे.

टाईमचा पचका – फेज 1

टाईम मासिकाचे चुकले काय तर त्यांनी त्यांच्या ऑनलाईन वोटींगसाठी सुरुवातीला CAPTCHA वापरलाच नाही. मुटला जिंकवणे फार अवघड नाही हे मुटच्या स्वयंघोषित पाठीराख्यांच्या लक्षात आले. त्यांनी मग वोटींगची URL क्रॅक करून, त्या URL चे स्ट्रक्चर समजाऊन घेऊन काही URL तयार केल्या आणि इंटरनेटवर असंख्य ठिकाणी त्या पोस्ट केल्या. माहीत नसलेल्या एखाद्याने त्यावर क्लिक केले की प्रत्यक्षात मुटला ...
पुढे वाचा. : टाईम मासिकाचा हॅकर्सनी केलेला पचका