वेदश्री, जिज्ञासेबद्दल तुझे कौतुक आहे, मात्र खालील किमान माहिती आपण राखली पाहिजे.
क्रमशः कंठ, टाळू, मूर्धा (मस्तक, शिखर, शेडा-जिभेचा?), दातांचे मूळ व ओठ या जागांमधे निर्माण होणाऱ्या उच्चारांना
कंठ्य, तालव्य, मूर्धन्य (जिभेचे टोक प्रथम वर टाळूला चिकटून मागून पुढे दातांकडे येते), दंत्य व ओष्ट्य अशी व्यंजने म्हणतात.
केवळ श्वासाचा उपयोग करून निर्माण होणाऱ्या व्यंजनांना कठोर तर फक्त नादाच्या उपयोगाने निर्माण होणाऱ्या व्यंजनांना मृदू म्हणतात.
याविषयी अधिक सविस्तर माहिती "शुद्धलेखन मार्गप्रदीप, लेखक अरुण फडके, अंकुर प्रकाशन, किंमत रू-६०/- फक्त"
या पुस्तकात मिळू शकेल. सुंदर पुस्तक आहे. विकतही घेतल्यास उत्तम.
भूत - भौतिक मग वर्तमान - वार्तमानिक (याऐवजी वर्तमान असाच शब्दप्रयोग वापरला जातो) भविष्य - भाविष्यिक (याऐवजी भावी असा शब्दप्रयोग वापरला जातो) का होत नाही?>>
भौतिक = related to physics