मतदान केंद्रावर सकाळी ७:०५ ला पोचलो. केंद्रावर आवश्यक कर्मचारी, पोलीस हजर होते. आल्या आल्या ज्यांना आपले मत कोणत्या खोलीत जाऊन नोंदवायचे ते माहित नव्हते अश्यांसाठी मतदार यादी असणारा मदतनीस होता. लोक शांतपणे रांगेत होते. पंखे दिवे चालू होते. केंद्रावर ओळखपत्र तपासणी, शाई लावणे वगैरे करून मत नोंदवले.

मतदानाआधी /दरम्यान कुठेही कसलीही अडचण जाणवली नाहि.

माझ्या ओळखीतील व ऑफीसातील असे मिळून चाळीस पन्नास जणांना विचारले त्यापैकी ७ जणांचे नाव मतदार यादीत नव्हते कारण त्यांनी नुकतेच निवास स्थान बदलले आहे. (म्हणजे मतदार यादीत नाव होते , मात्र सध्या राहतात त्या ठिकाणी नव्हते). बाकी ज्यांनी मतदान केले त्यांना कोणतीही अडचण जाणवली नाहि.