भूषणकाकांशी १००% सहमत.

धर्मगुरुच्या कर्तव्याबद्दल मला फारशी माहिती नाही त्यामुळे No Comment

किंवा थोडे लहान उदाहरण पाहू-
समजा, तुमचा एखादा जिवलग मित्र तुमच्या परिचयातल्या एखाद्या मुलीला फसवतो आहे, तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेतो आहे. ती बिचारी लग्नाची आस लाऊन बसली आहे. तो तुमचा मित्र असल्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल? मित्राची फसवणूक कराल का?

माझी/ माझा जिवलग मित्र/ मैत्रिण चुकत असेल तर प्रथम व्यक्तिशः भेटून त्याला/ तिला चुकीची जाणीव करून देईन. ही जाणीव योग्य त्या परिणामकारक शब्दात करून देईन, मृदू भाषेत समजत नसेल तर मनावर आघत करणारे कठोर शब्दप्रयोग केल्यावर त्याचे निश्चितच मतपरिवर्तन होते. (अर्थात मैत्रित जिव्हळा, सच्चेपणा असेल तरच) कारण आपल्या माणसांनी केलेली अक्षम्य चूक कोणालाही आवडत नाही. हे वागणे आदर्शवादी नव्हे तर "स्वाभाविक" आहे.

वैयक्तिक सांगायचे तर आमच्या मैत्रित रागाने टाकलेला एक कटाक्षच पुरेसा आहे, तेव्हा त्यांची नजरेला नजर भिडवायची हिम्म्त होत नाही (कधी कधी मी पण), नंतर वातावरण निवळल्यावर तो प्रसंग आठवून हसू येते, ती मजा काही वेगळीच.