वरील मुद्द्यांशी सहमत आहे. एक तर मराठी माणूस मागे पडला आहे, धोक्यात आहे हा अपप्रचार का चालू आहे हेच मला कळत नाही. चित्रपटात दाखवलेले वाईट अनुभव फक्त मराठीच नव्हे तर कोणत्याही 'मध्यमवर्गीय' माणसाच्या आयुष्यात येतील असे आहेत. आणि समजा वादाखातर असं समजलो की मराठी संस्कृती आणि मराठी माणूस धोक्यात आहे, तरीही वर वर्णन केल्याप्रमाणे धमक्या किंवा भाषण देऊन परिस्थिती कधीच बदलणार नाही. एकतर प्रगती मोजण्याचे मापदंडच चुकीचे आहेत. फक्त आर्थिक प्रगतीलाच आजकाल प्रगती समजतात. आणि मग वाट्टेल ते करून श्रीमंत झालं पाहिजे असा छुपा संदेश हे असले चित्रपट देतात.

दुसरा एक प्रश्न मला असा पडतो की शिवाजी महाराजांचा वापर कोण कोण आणि कशा कशा साठी करणार आहे अजून? एक तर शिवाजी नंतर मराठी माणसाला एकही आदर्श किंवा हिरो मिळू नये हे आश्चर्यच.  महात्मा फुले, सावरकर, ना. धो. कर्वे या लोकांनी सुरू केलेल्या कामाला पुढे न्यायची गरज असताना नुसतं जय शिवाजी म्हणून तुंबड्या भरायचे उद्योग चालू आहेत. (जर चुकून  शिवाजी महाराज अवतीर्ण झालेच तर मला वाटतं आधी बटाटेवड्याला 'शिववडा' नाव द्यायची शक्कल काढणाऱ्याला शोधून त्याच्या खांडोळ्या करतील  )