याबाबतीत मी अमेरीकेत असताना आलेला छोटा अनुभव सांगावासा वाटतो. अटलांटातील (जॉर्जिया) ट्राफ़िक हे अमेरिकेतील सर्वात बिझी मानले जाते. त्यादिवशी जोराचा वादळी पावसामुळे कुठेतरी एक वृक्ष विजेच्या तारेवर पडल्याने आमच्या मार्गावरील वाहतुक नियंत्रक दिवे बंद होते तरीही कोठेही ट्राफिक जामचा अनुभव आला नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक सिग्नलवर (पोलीस नसताना) सर्वजण अतिशय नियमबद्ध वाहने चालविताना दिसले. clockwise एकावेळेस एकजण अशारितीने कुणालाही त्रास न होता ते प्रत्येक चौक वापरत होते.
पुण्यात त्या दिवशी सिग्नलला सर्वात पुढे उभा होतो आणि पुढे जाण्यासाठी हिरव्यादिव्याची वाट पाहत होतो पण चौकाच्या दुसरीकडील वाहने संपताच माझ्या मागील जवळजवळ सर्वांनी हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. मी कुणालाही दाद न देता तसाच उभा राहीलो एवढ्यात शेजारचा निघाला त्याच्या बरोबर माझ्या मागचा वाहनांचा लोंढा मला धक्के देत, माझ्या कुटुंबियांच्या नावाचा उद्धार करीत पुढे निघून गेला.