मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, कागदोपत्री राजधानी आहे. ती 'ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे' असं ही म्हणतात. पण ते शासकीय कागदोपत्री नाही. राज्याच्या राजधानीचं वर्चस्व हे राज्याच्या प्रत्येक वा अनेक क्षेत्रात पडणं हे स्वाभाविक नाही आहे का? मग हा नवीन शोध आपल्याला लागला असं ओरडून-ओरडून का बरं सांगताय?
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा एक चित्रपट आहे. तो मनोरंजनासाठीच आहे म्हणून त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहायचे असते. इतर लोकं हेच करताहेत. 'नियती जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे समस्या म्हणून आपल्यावर ढकलते, कोसळवते तेव्हा त्याकडे आव्हान समजून त्यावर तुटून पडायचं व त्या समस्येतून आपल्या सुखासाठीची संधी शोधायची असते.' हे मी त्या चित्रपटातून समजलो. दृष्टीकोन बदलला कि सृष्टीबोध बदलतो. सृष्टीबोध बदलला कि (प्राप्त परिस्थितीत) त्यानुसार आपल्या प्रतिक्रीया बदलतात, प्रतिसादही बदलतात. ह्या बदलेल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद आपल्याला आपल्या जीवनाच्या नव्या व उच्च प्रतलावर आणून ठेवतात. तिथं पोहचणं हेच मनुष्याचे कर्तुत्व असते. कृपया मुंबईबद्दल पुन्हा असं वावगं बोलू नका. ती ह्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी नव्हे हृदय आहे.
तुमच्या दुसऱ्या मुद्द्याबद्दल म्हणायचं झालं तर, मीही ह्या उपक्रमाला माझ्याकडून ५०१/- रुपयाची मदत केलेली आहे. स्वतःला छानपणे, दिमाखदारपणे, आप-आपल्या कुवतिनुसार व्यक्त करता येणं हेच मानवी जीवन आहे असं मी मानतो तेव्हा कृपया असं रडू नका!
(व्यक्तिगत रोख व/वा विषयांतर वाटलेला भाग वगळला : प्रशासक)