बटाट्याच्या चाळीत शेवटचे 'एक चिंतन' हे एक प्रकरण आहे. त्यात अश्या अद्भुतरम्य कथांचा गमतीशीर उल्लेख आहे. .... हे लेखक नायक नायिकांना निरनिराळ्या संकटात टाकून शेवटी त्यांचे मीलन घडवीत..... असा काहीसा.
मी प्रथम हे वाचले तेंवहा काही पत्ता लागला नव्हता की हे कश्याबद्दल आहे. पुढे केंव्हातरी अशी एक प्रदीर्घ (मला वाटते ह्या बहुतेक सार्या कथा प्रदीर्घच आहेत) कादंबरी हातात पडल्यावर उलगडा झाला की हे काय प्रकरण आहे ते!
भन्नाट आहेत ह्या गोष्टी.