श्री. प्रभाकर ह्यांस,

प्रथम, लेख नीट वाचला तर ... हे वाक्य आपणास उद्देशुन अजिबात नव्हते.

आपल्या लेखाचे शीर्षक "उथळ विश्लेशण" अस होतं आणी त्या खालोखाल आपलं, "म.टा. मधील प्रतिमा जोशींच्या लेखातील वरील विधानच त्यांच्या बिनअभ्यासू आणि उथळ विचारांचे प्रतिनिधित्व करते." हे वाक्य होते. त्यामुळे आपल्याला तो संपुर्ण लेखच अजिबात पटला नाही, आणि आपण त्यांच्यावर थेट टिका करता आहात, असा माझा समज झाला. प्रतिभा जोशी, ह्या उथळ विचारांच्या आणि बिनअभ्यासू आहेत, असे आपण म्हणता आहात, असे मला वाटले.

जी व्यक्ती, स्वताःला defend करायला "मनोगत"वर उपलभ्द नाही, त्या व्यक्तीबद्दल असली टिका, ती व्यक्ति जिथे उत्तर देण्यास उपलभ्द असेल त्याठिकाणी केली तर, आपले आक्षेप/ आपली टिका त्यांच्यापर्यंत पोचली असती. म्हाणुनच योग्य त्या ठिकाणी बोलल्याच समाधानही झालं असतं. असे मी म्हणालो. मनोगतवर प्रतिक्रिया देऊ नका, अस मी कुठेच म्हाणालो नाही.

हा पंक्तीप्रपंच करताना 'ब्राह्मण' जातच त्यांच्या नजरेसमोर होती हे उघड सत्य आहे.

ह्याच कारण मी त्याच लेखात दिले आहे. वर्षा काळे ह्यांच्या आरोपावर आधारीत लेख असल्यामुळे टिका ब्राम्हणांकडे वळली. वर्षा काळे ह्यांनी समजा कुणा दुसऱ्या जातीवर आरोप केला असता, तर बहुतेक कोणीतरी, त्या जातीवर टिका केली असती. (वर्षा काळेंबद्दल माझं मत मी भाग १ मध्ये स्पष्टपणे लिहीलं आहे.)

आपल्यावर वैयक्तिक टिका कारण्याचा माझा हेतु नव्हता ह्याची कृपया नोंद घ्यावी.

मयुरेश वैद्य.