Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त्यांनी ठाणे शहराचा संपूर्ण कायापालट केला. अत्यंत कार्यक्षम व सचोटीचा अधिकारी अशी प्रतिमा जनमानसात होती. तर काहींच्या मते शहराचे नागरीकरण/आधुनिकीकरण ह्या नावाखाली मनमानी केली. जेव्हां एखादा अधिकारी बेधडक कृती करतो तेव्हा दोन्ही बाजूने मतप्रवाह वाहणारच. कोणाच्याही दबावाला बळी न पडणारे लोक फारच दुर्मिळ आहेत.

चंद्रशेखर यांचे काम चांगले का वाईट- हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. ज्यांची दुकाने, घरापुढचे अंगण रस्ता रंदीत गेले आहे ते नक्कीच बोटे मोडणार. परंतु मुळात वरिष्ठ अधिकारी कुठल्याही प्रकारची मनमानी-मग ती स्वत:च्या स्टाफची असली तरीही खपवून घेणारा नसेल तर जनसामान्यांना आवडतो. चंद्रशेखर यांच्या हाताखालील लोकांना हे चांगलेच माहीत होते. जर राजा कार्यक्षम असेल तर जनतेला किती उपयोग होतो ह्याचे हे एक छोटेसे उदाहरण.

ठाण्याच्या नीतिन कंपनी जवळच्या उड्डणपुलाचे काम सुरू होते. आमचे घर ...
पुढे वाचा. : यथा राजा तथा अधिकारी