....... या प्रकारचे आहे. जिथे, शब्दार्थ अपेक्षीत आहे तिथे भावार्थ गृहित धरला जातोय व जिथे भावार्थ अपेक्षीत आहे तिथे शब्दार्थ.

एक चित्रपट काढणे म्हणजे विनोद नाही. भावार्थ: हे एक जिकीरीचे अवघड कार्य आहे. नुसत्या फुटकळ बाजारगप्पा / चर्चा करण्याएवढे ते सोपे नाही.

आपल्यापैकी किती लोकं हे धाडस करू शकतील. : हा प्रश्‍न तेंव्हा नक्कीच उपस्थीत होउ शकतो, जेंव्हा दिग्दर्शकाच्या कौशल्याचे वस्तुनिष्ठ, नेमक्या, घटकांप्रती परीक्षण न होता, घाउक विधानांमार्फत " भरकटलेले " असा शेरा / आरोप केल्या जातात.

चित्रपटाचे परीक्षण म्हणजे चांगल्या-वाईट बाबी लिहिणे. केवळ टिका करणे नव्हे. : ही चर्चा जर एक [चित्रपट / दिग्दर्शक ] परीक्षण स्वरुपाची असेल, तर ती एकांगी त्यातही नकारात्मक स्वरुपाची नसावी ही इच्छा प्रकट होते. म्हणजे दिग्दर्शकाचे यशापयश दोन्ही उद्धृत व्हावेत अशी इच्छा.

स्वतः करून बघा : स्वैर, एकांगी, नकारात्मक, असृजनात्मक आणि अवास्तवीक चर्चा / चर्चेचा प्रस्ताव लिहीण्यापुर्वी, एखादे छोटे नाटक, एकांकिका वा तत्सम कार्य स्वतः दिग्दर्शीत, उत्पादीत करून पाहावे ही इच्छा प्रकट झाली आहे.

" जावे त्याच्या वंशा म्हणजे कळे, ............  तोंडचे पाणीही पळे " असा काहिसा [ अनाहूत ] योग्य सल्ला इथे भावार्थात गृहीत धरला जावा.

चु. भु. देशमुख साहेबांनी देणे घेणे.

धन्यवाद !