मतदान न करणे हा नाकर्तेपणाचा व उदासीनतेचा कळस आहे. लाँग वीकएंड आला म्हणून मुंबई-पुण्याबाहेर पळणाऱ्या सर्वांना आपल्या देशाच्या परिस्थितीचे भान नाही असे खेदाने म्हणावे लागते.
हा देश सुधारण्यासाठी केंद्रात कुठल्याही प्रमुख राष्ट्रीय पक्षाचे सरकार येणे आवश्यक आहे. तरच ते काही सुधारणा घडवून आणू शकतील. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून डोळस मतदान करणे आवश्यक होते. प्रादेशिक पक्षांना अवास्तव महत्त्व मिळाल्यामुळे आपली ही आजची अवस्था झाली आहे. देशावर एवढे मोठे हल्ले झाल्यावरही जर लोकांना जाग येत नसेल तर आपणही पाकिस्तानच्याच वाटेने प्रवास सुरू केला आहे असे वाटते.

'विनाशकाले विपरित बुद्धी!!!