श्री. वृकोदर ह्यांस.
आपल्या समाजात प्रत्त्येक जाती/धर्माला काहीना काही ( चांगली/वाईट) विशेषणे चिकटलेली आहेत, ह्याला फ़क्त ब्राम्हण अपवाद नाही. उदा. कोणात्याही धर्मांध वर्तनास, आपण "तालिबानी" म्हणतो. पंजाबी लोकांना "सरदार" ठरवतो. मारवाडी लोकांना "कंजुस" तर गुजराथी लोकांना "ते धंद्यात चांगले" असे आपण म्हणतो. (ह्या असे म्हणण्यास, आपण वा मनोगति अपवाद असु शकतील). आपल्या समाजात प्रत्येकालाच काहीना काही विशेषण चिकटलेलंच असत. ( ते चुक की बरोबर हा वेगळा विषय ).
कित्येकदा विरोधी विचार मांडणारी पत्रे प्रकाशित केली जात नाहीत.
हा आपला दावा मला मान्य नाही. निदान, आम्ही पक्षःपात करत नाही, हे दाखवुन देण्याकरिताका होईना, विरोधी विचारांची पत्रे प्रकाशित करावीच लागतात.
आपणास प्रतिभा जोशी माहित असतील तर त्यांना मनोगतवर बोलवा की!
प्रतिभा जोशींना मी अजिबात ओळखत नाही. एकंदरीत ह्यामुद्दयावर मी बराच खुलासा केला आहे. मनोगतवर चर्चा करु नका असे मी म्हटलेले नाही. पण आपल्या प्रतिक्रिया / आक्षेप मुळ लेखकांपऱ्यंत पोचाव्या. आणि जी व्यक्ति (स्वतःला defend करायला) ईथे नाहिये, त्या व्यक्तिवर ईथे टिका नको अस माझ म्हाणणे आहे. त्यात चुक काय ?
ब्राह्मणांनी आपल्याकडे ज्ञान आहे असे "भासवून" इतरांना गप्प केले हा आपला दावा पोकळ आहे.
हे आपलं मत आहे, आणि मला ते मान्य नाही, म्हणुनतर हा सगळा वाद चालु आहे.
मूठभर लोकांच्या "काव्याला" बळी पडले ही ह्या ढीगभर लोकांचीही चूक आहे.
चोराचं जाउद्याहो तो शेवटी चोरचं, पण, चुक तुमचीही आहेच , तुम्ही कशी काय बरं चोरी होऊ दिली ? चोरी झाली तेव्हा झोपला होता का ? अशा आशयाचं आपलं हे वाक्य आहे, अस मला वाटतं.
मग ब्राह्मणांनी आपली शक्ती वापरुन जातिवाचक अपमानाला विरोध करायचे ठरवले तर आपल्या पोटात का दुखते?
मला काही पोटात दुखत नाहीये. ज्याप्रमाणे आपण आपली मतं मांडता आहात, त्याच प्रमाणे मी माझं मत मांडतोय.
मयुरेश वैद्य.