लिहिण्यास कारण की......... येथे हे वाचायला मिळाले:

सकाळी आरामात उठून आईच्या हातचा गरमागरम चहा पित होते.

इतक्यात श्री आला..

"अग आई, हरिहरबुवा गेले."

"अरे देवा.." --आई

"मी निघालोय तिकडेच. तुम्हीही या सगळे आवरुन." श्री आला तसा घाईघाईत निघुन गेला.


आई माझ्याजवळ येऊन बसली. "अंजु, येणारेस का ग तू पण?"

"हो जाऊन येऊ या."

हरिहरबुवा आमच्या गावातलं एक बडं प्रस्थ. गायनक्षेत्रातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. गावात एक मोठी गायनशाळा होती त्यांची. अगदी गुरुकुलच म्हणा ना. तिथे प्रवेश मिळणं म्हणजे तर मोठी गोष्ट होतीच पण प्रवेश मिळुन तिथे टिकून राहणं ही देखील एक अवघड गोष्ट होती.बुवांच्या कडक स्वभावाच्या कहाण्या सार्‍या गावात सांगितल्या जायच्या. पण त्याचबरोबर त्यांना मानही दिला जायचा. त्यांचे गाणे ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच होता. हरिहरबुवा आमच्या गावाचे भूषण होते. 

 ...
पुढे वाचा. : होते कुरुप वेडे....