जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
लोकसभेच्या निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा काल म्हणजे ३० एप्रिल रोजी पार पडला. आता सर्वाना प्रतिक्षा आहे ती १६ मेची. कारण या दिवशी राज्यासह देशभरातील सर्व निकाल जाहीर होणार आहेत. प्रचाराची रणधुमाळी आणि निवडणुकीवर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे राज्यातील जनतेने सुटकेचा निश्वास टाकला असला तरी हे समाधान फक्त काही महिन्यांपुरतेच आहे. राज्यातील जनतेसाठी हा निश्वास फक्त पाच-सहा महिन्यांचाच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा निवडणुक प्रचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी व शह-काटशहाचे राजकारण सुरु होणार आहे. कारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रराज्य विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. पुन्हा एकदा करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होणार असून विधानसभा निवडणुकीवर नाहक कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. लोकसभेबरोबरच राज्य विधानसभेची निवडणुक घेतली गेली असती, तर हा खर्च नक्की वाचवता आला ...