Laughing Shop लाफिंग शॉप येथे हे वाचायला मिळाले:
संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीवर बातम्या बघण्यासाठी दिन्या सोफ़्यावर बसतो. ' सबसे तेज ' हे त्याचं आवडतं चॅनेल.त्याला स्थानिक बातम्यांमध्ये फारसा रस नाही.दिन्या किमान राज्यपातळी किंवा त्यापुढील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळतो.तालीबानच्या बंदोबस्तासाठी बराकने कुठली खेळी खेळायला हवी होती हे फक्त दिन्याच सांगू शकतो.गॉर्डनचं कुठे चुकलं हे फक्त दिन्यालाच कळतं.बराक आणि गॉर्डन दिन्याच्या टीकेला जाम टरकून असतात. बराक म्हणजे आपला ओबामांचा दिवटा ! आणि गॉर्डन म्हणजे यु के च्या ब्राऊनचं शेंडेफळ !परवाच बराक विजयी झाला तर जगभरातून त्याचं अभिनंदन होत असतांना बराकने अगोदर दिन्याला फोन केला .म्हणाला दिनकरराव , खरं तर बराक ड्रिंकरराव असंच म्हणाला होता ते जाऊ द्या. बराक म्हणाला होता , दिनकरराव तुम्ही ' यस वुई कॅन ' ही स्लोगन दिली नसतीत तर माझं काही खरं नव्हतं. शरदरावांनी विलासरावांना कसा शह द्यायला हवा होता याची खबरबात आबांशिवाय फक्त दिन्यालाच आहे.अटलांटीक समुद्रापारचे साहेब आणि आपले बारामतीचे साहेबही आपलं ऐकत असतांना घरात बायको आपलं ऐकत नाही हे शल्य त्याला आहे आज जेंव्हा तो ऑफीसहून घरी परतला तेंव्हा आपण ऑफीसला गेल्यापासून जगात काय काय उलथापालथ झाली असेल या चिंतेने तो व्याकूळ झाला होता. मात्र चिरंजीवांनी अगोदरच टेन स्पोर्टसचा ताबा घेतलेला असल्याने अजून अर्धा तास तरी आपल्याला संधी मिळणार नाही हे जाणून तो वर्तमानपत्र ...