क+ह=ग्घ; ख नाही. उदा. वाक् + हरी = वाग्घरि(वाखरी नाही!).
त + ह = द्ध; थ नाही. उदा. उत् + हार = उद्धार(उथार नाही! ).
ख्छ्ठ्थ्फ् आणि घ्झ्ढ्ध्भ् हे अनुक्रमे क्च्ट्त्प् आणि ग्ज्ड्द्ब् यांचे हकारयुक्त उच्चार आहेत. ही जोडाक्षरे नाहीत. लिखाणात सारखी सारखी लागत असल्याने या अक्षरांना आपल्या लिपीत स्वतंत्र खुणा दिल्या आहेत. अशाच स्वतंत्र खुणा त्र, श्र आणि ॐ यांना दिल्या आहेत.
हकारयुक्ताप्रमाणेच अनुनासिक उच्चार असतात. त्याची काही उदाहरणे:-- टपाल हंशील. यातील हं चा हम् असा अनुस्वारयुक्त उच्चार करायचा नाही, तर हं असा अनुनासिक करायचा. अनुनासिक=नाकाबरोबर(स्वरानंतर नाही). अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वर म्हणत नाहीत तर स्वरादी म्हणतात. म्हणजे अनुस्वार-विसर्गांच्या आधी स्वर येतो. हम्=ह्=अ=म्. याउलट, अनुनासिक हा ऱ्हस्व-दीर्घ-प्लुत यांप्रमाणे स्वराच्या उच्चाराचा एक प्रकार आहे. असला 'हं' आपण अनेकदा बोलताना वापरतो. मी आहे हं; हं, बरोबर आहे; हं हं! शिवाय, हां, हुं वगैरे.
भू(धातु)=होणे; भूत(वि)=झालेले; भूति(नाम)=अस्तित्व; भौतिक(वि)=अस्तित्वात असलेले. भौतिक हा शब्द भूतीपासून झाला, भूतपासून नव्हे.
वर्तमान हे मुळात विशेषण आहे. (पहा, वर्तमान काळ, भविष्य काळ). त्याला इक लागणार नाही. भविष्य हे पण विशेषण. 'भव'पासून भाविन्(भावी) हे विशेषण बनते. यावरून वार्तमानिक/भाविष्यिक ही रूपे का होत नाहीत ते समजावे अशी अपेक्षा आहे.