माझा हा एके काळचा जिव्हाळ्याचा विषय होता. आपण पत्ता शोधत असताना अशा अनुभवात आपली हीच प्रतिक्रिया असते. पण नंतर त्या प्रसन्गांच्या आठवणीने गप्पांची रंगत मात्र खूप वाढते असा अनुभव आहे.  विषेशत: पुण्यात पत्ता शोधतानाच्या झडलेल्या संवादांची तर मजा अजूनच और.  

अगदी आत्ता-आत्तापर्यंत माझ्या सासऱ्यांची कुणा अनोळखी माणसाने विचारला तर पत्ता सांगण्याची पद्धत  'ते... ते टोपीवाले गृहस्थ दिसतात ना, त्यांच्या पाठीमागे जा' अशीच होती. असे करताना ते पत्ता विचारणारा, त्यांची स्वतःची मुले, नंतर सुना आणि आता नातवंडे यांची चांगली करमणुक स्वतःच्या नकळत करत असत.