वाक् + हरी करताना क् चा ग् होईल हे ठीक आहे. मग घ कुठून येतो?
मला
वाक् हरी-> वाग् हरी -> वाग्हरी ... असे होईल असे वाटत होते.
ग्घ चे उदाहरण मिळाले. सम्यग्घविर्हुत्वा .. येथे सम्यक् + हविर्हुत्वा.. असे असावे.
मी ग्ह ची उदाहरणे शोधून पाहिली. एकच मिळाले.
येथील पानावर वाग्हस्तवता हा शब्द दिसला. येथे ग्ह संधी काय नियमाने झाला असावा? (वाक् + हस्तवता ?)
कृपया माहिती द्यावी.