महाराष्ट्रातून कुठूनही सहज पोहोचता यावे ह्या उद्देशाने 'मनमाड' राजधानी करायला काय हरकत आहे?

मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

अमेरिकेत काही (बऱ्याच? ) राज्यांच्या राजधान्या 'आडशहरा'तच असल्याचे दिसते. चू भू. द्या. घ्या.

काही तुरळक अपवाद सोडल्यास हे जवळपास सर्वच राज्यांच्या बाबतीत सत्य असावे. किंबहुना अटलांटा, होनोलुलू, इंडियानापोलिस आणि फिनिक्स हे चारच अपवाद लक्षात येतात.

बहुधा अशी योजना ही जाणूनबुजून केलेली आहे असे वाटते. चूभूद्याघ्या.