मित्रांनो क्षमा असावी, दर वेळी मी अमेरिकेची उदाहरणे देतो.

अमेरिकेत ५० राज्ये आहेत. बहुतांश राज्यात १ / २ प्रसिद्ध शहरे असूनही राजधानीचे ठिकाण अप्रसिद्ध व आकाराने थोडे लहान असते. जसे शिकागो हे राजधानीचे शहर नसून स्प्रिंगफील्ड हे शहर इलिओनाय राज्याची राजधानी आहे. हा दुवा बघा.

दुवा क्र. १

अमेरिकेत अधिकार, संपत्ती व संधींचे वाटप अधिक समानतेने झाले आहे असे दिसते. थोडा अपवाद मध्य अमेरिका.

जसे, पश्चिम किनाऱ्यावर मोठमोठ्या बँका व आर्थिक संस्था आहेत. तर पूर्व किनाऱ्यावर तंत्रज्ञान संस्था आहेत उदा. सिलिकॉन व्हॅली.

उत्तर भागात मोटारीचे कारखाने. उदा. डेट्रॉईट. मध्य अमेरिकेत शेती व बागायती व अन्न - प्रक्रीया उद्योग.

आता महाराष्ट्राचेच बघितले तर आजवर सरकारने नव्या उद्योगांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पुणे या भागातच प्रोत्साहन दिले. इथे जागा व संसाधने कमी पडू लागल्यावर नाशिक व औरंगाबाद येथे काही उद्योग सुरू करण्यात आले.

पण इतर शहरे गुणवत्ता असूनही याबाबतीत मागे राहिली. जसे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती नांदेड व इतरही.

अन, मुंबई व पुणे ही रोजगाराची केंद्रे बनली व इतर भागांतून स्थलांतरीतांचा ओघ सुरू झाला. व या शहरांतील मूळ नागरिक मात्र आम्ही मोठे उपकार करत आहोत असे दाखवू लागले. जर मुळात संधींचे वाटप समानतेने झाले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेच नसते व विकासाचा खासकरून रोजगाराच्या उपलब्धतेचा समतोल राहिला असता.

जी परिस्थिती या चित्रपटामध्ये दाखविली आहे ती तशी उद्भवलीच नसती.