एकदम वाचल्यावर हास्यास्पद / अनाकलनीय वाटेल अशी ही घोषणा आहेच, परंतु भाषा ही वळवावी तशी वळते या संशयाचा फ़ायदा जाहिरातदारांना द्यायचा झालाच तर खालील मुद्दे विचारात येतातः
हे खूपच ओढून-ताणून आणलेलं चंद्रबळ आहे हे अगदी मान्य आहे - आणि मी स्वतः लक्सचा विक्रेता किंवा भोक्ता आहे अशातलाही भाग नाही - पण एखादी बाजू समजावून घ्यायची असेलच तर आपण किती टोकाला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणून हे स्पष्टीकरण लिहीले आहे असे समजा. (आता इतकी समजूत मी माझ्या प्रिय पत्नीची मनोभूमिका समजावून घेताना का दाखवत नाही हा एक वेगळाच विषय होईल तेंव्हा तिकडे न गेलेलेच बरे )