मुंबईतल्या मंडईचे काय नाव होते? (क्रॉफर्ड मार्केट?)
बरोबर.
मुंबईत आणि पुण्यात फुले मंडई आहे. पुण्यातली मंडई म्हणजे जुने रे मार्केट...
बरोबर. पुण्यातली मंडई (महात्मा फुले मंडई) म्हणजे पूर्वीचे (लॉर्ड) रे मार्केट, आणि पुण्यातले घोले रस्त्यावरचे महात्मा फुले वस्तुसंग्रहालय म्हणजे पूर्वीचे लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियम.
अवांतरः रे मार्केटचे काय किंवा लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियमचे काय, मूळ नाव ज्याच्या नावावरून पडले, तो लॉर्ड रे हा मुंबई प्रांताचा स्वातंत्र्यपूर्व काळातील एक गव्हर्नर होता असे कळते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याने आपले नाव बदलून 'महात्मा फुले' केले किंवा कसे, ते कळत नाही.
(पण मग मुंबईतील हार्बर लाइनीवरील रे रोडचे नाव याच लॉर्ड रेवरून पडले. रे रोडचे नामकरण पुढे काही झाले का किंवा काय झाले ते कळले नाही.)