आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

निवडणुकांच्या निमित्तानं बाहेर येणाऱ्या प्रवृत्तींकडे त्यामागच्या स्वार्थाकडे, भ्रष्टाचाराकडे आणि निकालानं जैसे थे राहणाऱ्या व्यवस्थेकडे आपली तिरकस नजर लावणारा चित्रपट म्हणजे अलेक्‍झांडर पेनचा "इलेक्‍शन'. "इलेक्‍शन'मधली निवडणूक ही खरं तर शाळेतली - मायक्रो पातळीवरची; पण तरीही या संपूर्ण प्रक्रियेवर नेमकं बोट ठेवणारी. राजकारणावर आधारित आणि प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारा; विनोदी पण तरीही विचारी, असा दुर्मिळ, निवडणुकीशी संबंधित वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेतील दुसरा चित्रपट.

निवडणुकीला उभे राहतात ते उमेदवार सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी असतात अशी एक अफवा आहे. काहींचा त्या अफवेवर दृढ विश्‍वास आहे; इतरांचा तितका नाही. मात्र त्यासंबंधात प्रत्यक्ष काही करणं हे कल्पनेपलीकडलं असल्यानं, ते सत्य असल्याचं स्वतःच्या मनाला पटवणं, हे त्यांना सोपं वाटतं. शिवाय सध्या मतदान करणं म्हणजेच समाजसुधारणेच्या दिशेनं काही पावलं उचलणं, असाही एक समज दृढ होताना दिसतो. पण याचा अर्थ असा म्हणावा का, की केवळ निवडणुकीची यशस्वी प्रक्रियाच आपल्याला कधी ना कधी स्वच्छ समाज आणि प्रामाणिक राज्य व्यवस्था देईल? त्यात प्रत्यक्ष उमेदवारांच्या चारित्र्याचा काहीच हात नसेल? या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्यांचा वा विरोध दर्शवणाऱ्यांचा त्यांच्या भूमिकेमागे काहीच स्वार्थ नसेल? प्रत्यक्ष उमेदवारांचा हेतू चुकून जनतेचं कल्याण हाच असला, तरी त्यासाठी त्यांच्या डोळ्यांसमोर असणारा मार्ग हाच योग्य मार्ग असेल? केवळ एक "इलेक्‍शन' आपल्या शंभर व्याधींवरचा ...
पुढे वाचा. : वर्मावर बोट ठेवणारा इलेक्‍शन