रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:
छत्रपतींच्या राज्याभिषेकाला भारतीय ईतिहासात अनन्यसाधारण महत्त्व का आहे याचा संक्षिप्तात आढावा आपण मागच्या लेखात घेतला. या लेखात त्यांच्या राज्याभिषेकाला सध्य काळात फारस महत्त्व का दिल्या जात नाही याबद्दल चर्चा करणार होतो. पण त्या आधी मला राज्याभिषेकाचे महत्त्व सिध्द करणारे अजुन काही मुद्दे सुचले. ते मी इथे प्रथम प्रस्तुत करतो.
मागल्या लेखात शिव-राज्यारोहणाच्या वेळीस भारतीय उपखंडात मुसलमानी सत्तांची स्थितीची चर्चा मागल्या लेखात केली पण या मुसलमानी सत्तां व्यतिरिक्त पोर्तुगित, इंग्रज आणि फ्रेंच या तीन युरोपियन सत्ता भारतात जम बसविण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यातील ब्रिटिश पुढे राज्यकर्ते झालेच. पण शिवा-जी राजांच्या वेळी सगळ्यात अधिक धोका पोर्तुगिज लोकांकडुन होता. १४व्या शतकाच्या अंतिम भागात नविन जग पादाक्रांत करण्यास युरोपियन देशांनी आरंभ केला. यात स्पॅनिश आणि पोर्तुगिज लोक आघाडीवर होते. अर्थात, जग पादाक्रांत करायला ही लोक निघाली नाहीत. भारताला जाण्याचा समुद्री मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात त्यांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचा या युरोपिय देशांनी पुरेपुरे फायदा उठवला. मुसलमानी अंमल अरबी आणि पर्शिया प्रांतावर स्थापित झाल्यापासुन भारताशी आणि चीनशी व्यापार करण्याचे सर्व मार्ग मुसलमानी प्रांतातुन जात असत. मुसलमान आणि ख्रिश्चनांमधील धार्मिक युध्दांना १४ व्या शतकात ऊत आला होत त्यामुळे भारतात जाण्यासाठी समुद्री मार्ग शोधणे आवश्यक झाले होते. भारत शोधण्याच्या मार्गातच दोन्ही अमेरिका खंडांचा शोध लागला. साम्राज्यवादाचा पायंडा इथे पडला. पृथ्वी गोल आहे या वर ...
पुढे वाचा. : शिव-राज्यारोहण भाग २