काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


परवाच्या पेपरला एक बातमी होती. जयपुरला १२ वर्षाची मुलगी प्रसुत हौऊन तिला मुलगी झाली. मला वाचल्याबरोबर धक्काच बसला. कांही दिवसांपुर्वी १३ वर्षाचा मुलगा युके मधे बाप झाल्याचे वाचनात आले होते. तिचं लग्नं पण झालेलं होतं साधारण तिच्याच वयाच्या मुलाशी. तिला बिचारिला अगदी  मुल होई पर्यंत आपण  प्रेग्नंट आहोत हे माहिती नव्हतं आणि जेंव्हा डीलिव्हरीचि वेळ आली तेंव्हाच लक्षात आलं. धन्य आहे तिच्या आइ बापांची!!!ही बातमी वाचतांना स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? तिला जर मुल १२व्या वर्षी झालं , म्हणजे तिचे यौन संबंध ११ व्या वर्षीच सुरु झालेत. ज्या वयात तिने बाहुलिशी खेळायचं त्या वयात तिला मुलं झालं. राजस्थानात बाल विवाह अजुनही चालतात. तसेच युपी आणि बिहार मधे हरियाणा, आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातही आहेच!

हा प्रश्न केवळ भारतालाच नाही तर संपुर्ण जगालाच छळतो आहे. जगातल्या पुरुष प्रधान संस्कृतिने अजुनही ह्या संबंधी कायदे होऊ दिलेले नाहीतबाल विवाहामुळे मात्र अजुनही प्रिटीन्स किंवा टिन एज मदर्सचं प्रमाण खुप प्रमाणात आहे. अंडरडेव्हलप्ड कंट्रिज मधे बाल विवाह, आणि डेव्हलप्ड कंट्रिज मधे प्रि मॅरिशिअल सेक्स,  फार कमी वयात सुरु होणारे डेटींग, किंवा अपरिपक्व वयात पाहिलेले अश्लिल चित्रपट, इंटरनेटवरचे प्रोर्न साहित्य इत्यादिंचे एक्स्पोझर्स मुळे मुलं फार लहान वयात सेक्स ट्रॅप्स मधे ( समवयस्क किंवा वयाने मोठ्या पार्टनर्स ) ...
पुढे वाचा. : प्रिटीन मदर्स.