दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
अपेक्षित शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी दहा पानं उलटवा, पॉकेट डिक्शनरीजच्या छोट्या प्रिण्टमधून शब्द शोधताना डोळे दुखवून घ्या, हे तसं कंटाळवाणं आणि वेळखाऊ काम. मुख्य म्हणजे डिक्शनरीचं किलोभर ओझं सोबत बाळगा या साऱ्या व्यापातून सुटका करून घेण्यासाठी तुमच्या दिमतीला सदैव तत्पर असणारा प्रकार म्हणजे ऑनलाइन डिक्शनरीज. कम्प्युटरचा सदैव वापर करणाऱ्या टेक्नोसॅवी पिढीला सध्या हा पर्याय अधिक सोयीचा वाटू लागलाय. हजारो पानांचे आणि अनेक खंडांचे शब्दकोश वापरण्याचे दिवस केव्हाच सरले. म्हणूनच काळाच्या ओघात या शब्दकोशांची जागा ऑनलाइन डिक्शनरीने ...