दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
घरी कम्प्युटर आहे पण इंटरनेट नाही असे क्वचित होते. बऱ्याच लोकांना इंटरनेटपेक्षा मायक्रोसॉफ्ट वर्डवर काम करणे अधिक गरजेचे असते. तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणता ऑफिस पॅक बसविलेला आहे त्यावर त्याचे काम किती वेगाने होते वा किती अधिक सुलभतेने होते हे ठरते. 'वर्ड ६' हे व्हर्जन ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे ऑफिस २००३ वा आत्ताचे 'ऑफिस २००७' यापेक्षा खूपच कमी सुविधा असतील हे उघडच आहे. तरी मराठी अथवा इंग्रजी मजकूर टाइप करण्यासाठी अजून तरी मायक्रोसॉफ्ट वर्डचाच वापर मोठ्या प्रमाणात होतो. नाही म्हणायला वर्डशी स्पर्धा करण्यासाठी ऍबिवर्ड, ओपन ऑफिस रायटर (निर्माते सन मायक्रोसिस्टिम्स) अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या पॅकमध्येच वर्डचा समावेश ...