दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:

तुमचा कम्प्युटर अगदी शहाण्या मुलासारखा नीट चालला आहे, तरी त्यात काहीतरी गडबड आहे असे म्हटले तर हा विरोधाभास वाटेल. परंतु, वरवर हे मशीन चांगले चालत असल्याचे वाटले तरी प्रत्यक्षात अत्यंत असुरक्षित असू शकते. गेल्या काही महिन्यांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांआधी जो ई-मेल पाठविण्यात आला तो वायफाय तंत्रज्ञान वापरताना झालेल्या मानवी उणिवा शोधून पाठविण्यात आला होता. ही उणीव म्हणजे आपला लॅपटॉप पूर्णपणे सुरक्षित आहे व तो बाहेरून कोणी ऍक्सेस करू शकत नाही याची खात्री संबंधितांनी केली नव्हती. ही खरी गंमतच आहे. आपल्याला इंटरनेटद्वारे सारे जग आपल्याजवळ आणायचे आहे. ब्रॉडबँड घरी असले तर मग अधिक वेगाने हे जग जवळ येऊ शकते. त्याच वेळेला, आपल्या कम्प्युटरमध्ये काय दडलेय ते बाहेरच्यांना कळता कामा नये, अशा प्रकारचा अट्टाहास आपण धरायचा. हा प्रकार एकतर्फी वाटला तरी सध्याच्या परिस्थितीत तो फारच महत्त्वाचा आहे.

तुमच्या कम्प्युटरमध्ये अशी सोय हवी ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २