दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
तुम्ही इंटरनेटसाठी कोणताही ब्राऊजर वापरत असाल तरी तो ओपन केल्यावर जे पेज दिसते त्याला आपण होम पेज म्हणतो. हे होम पेज प्रत्येकाच्या आवडीनुसार सेट करता येते. समजा तुम्ही 'इंटरनेट एक्स्प्लोरर ७' वापरता आहात (याच्या आधीचे व्हर्जन ६ काहीजण वापरतात; कारण तो वापरायला अतिशय सुटसुटीत आहे. पण व्हर्जन ७ कम्प्युटरच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक फायद्याचा आहे) तर त्याच्या 'टूल्स'वर क्लिक करा, अगदी तळाच्या 'इंटरनेट ऑप्शन्स'वर क्लिक करा. एक बॉक्स ओपन होईल. त्याच्या पहिल्याच 'जनरल' टॅबमध्ये सुरुवातीलाच 'होम पेज' अशी सोय असेल. तुम्हाला जे होम पेज करायचे असेल, त्याचा यूआरएल (म्हणजे पत्ता) टाइप केल्यावर ते होमपेज होईल. तुम्ही नंतर जेव्हा जेव्हा ब्राऊजर ओपन कराल, तेव्हा तेव्हा हेच पान ...