शारीरिक अस्तित्व असलेली स्त्री आतापर्यंतच्या त्याच्या जीवनात उमटलीच नव्हती. तशा त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात अनेक दिवल्या नाचून गेल्या होत्या, पण आतापर्यंत त्यातून एकही सावली आकारली नव्हती.

दिवली आणि सावली ही कल्पना छान वाटली

"तसेच दोन जीवांच्या मीलनाचे शारीरिक, भावनिक, व्यावहारिक असे वेगळाले पैलू असतात हेही मला मान्य नाही. मीलनाची झळाळी या सगळ्या तुकड्यांना कवेत घेते.

क्या बात है

शब्दांच्या पोषाखावरून आतल्या विचारांची कल्पना करणे चूक आहे. पण कालांतराने हा अंदाजपंचे कारभार चालवायची सवय होऊन जाते. "

सुंदर विचार

"तुम्हां लोकांना तर याची पिढीजात सवय होऊन बसली आहे. परंतु या ग्रहावरची ....

इथे एकदम वरचा गिअर टाकलात कीहो  त्याअअधी मला साधी गोष्ट वाटली होती.

शेकडो ज्वालामुखी एकत्र विस्फोटत असल्याप्रमाणे त्यांचा अणू-रेणू झळाळून उठला आणि त्या अग्निलोळाने साऱ्या समुद्राला सामावून घेतले. भैरवीच्या मीलनक्षणाचा तृप्त आवेग पोटात साठवून समुद्र गर्जत राहिला.

सुरेख.

तुमच्या गोष्टे वेगळ्याच असतात.