चौकसराव,

गेल्या काही दिवसातच तुम्ही ३ सिक्सर मारलेल्या आहेत. भैरवीची संकल्पना व लिखाण केवळ लाजवाब!
खरोखर भैरवीचे सगळे सूर कोणालाही गवसणार नाहीत. तो एक अथांग समुद्र आहे.
नेहमीप्रमाणेच तुमच्या वैशिष्ठ्यपूर्ण उपमा, नवीन क्रियापदे आवडली.
पण तुमचे लिखाण वाचले की मला ,तुम्ही, "हा माझा मार्ग एकला" मधल्या नायकाच्या भूमिकेत दिसता.
   तुमच्या बऱ्याचशा लिखाणातून तो डोकावत राहतो. आणि 'छळते अजुनि, स्वप्न ते मला' किंवा 'विझवू बघतो जाळ आतला', असे अव्यक्तपणे म्हणतोय असा भास होतो.

माझे वाटणे खरे असेल तर मला दुःख होईल. तो कल्पनेचा खेळच असू दे!